Jhabua Hindu Conversion Case : हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्रयाला (ख्रिस्ती धर्मोपदेशकाला) ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा !

झाबुआ (मध्यप्रदेश) येथील धर्मांतराचे प्रकरण

झाबुआ (मध्यप्रदेश) – येथील गरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या रमेश नावाच्या पाद्रयाला (ख्रिस्ती धर्मोपदेशकाला) अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र कुमार शर्मा यांनी ‘मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०२१’च्या अंतर्गत ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच आणि १ लाख २५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला.

आरोपी पाद्री रमेश याने झाबुआ जिल्ह्यातील काही हिंदूंना बोलावून घेऊन त्यांच्यावर पाणी शिंपडले होते आणि त्यांच्यावर ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी दबाव आणला होता. त्याने हिंदूंना सांगितले की, ‘‘तुम्ही ख्रिश्‍चन झालात, तर दर महिन्याला १ सहस्र रुपये मिळतील आणि मोटारसायकही मिळेल. तसेच कुटुंबियांवर वैद्यकीय उपचार विनामूल्य उपचार केले जातील.’’

पीडित हिंदूंनी पाद्रयाच्या विरोधात राणापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०२१’च्या  कलम ३,५,१० (२)च्या अंतर्गत  गुन्हा नोंदवला होता.

संपादकीय भूमिका

आता हिंदूंनीही स्वधर्माचे शिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवावा, जेणेकरून कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही !