North Korea : उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्‍यात अपयशी ठरल्‍याने ३० अधिकार्‍यांना फाशीची शिक्षा

पुरामुळे १ सहस्र लोकांचा झाला होता मृत्‍यू !

प्‍यांगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियात आलेल्‍या पुराचा सामना करण्‍यात अपयशी ठरल्‍याबद्दल हुकूमशहा किम जोंग उन याने देशातील ३० अधिकार्‍यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ‘हे अधिकारी कोण आहेत ?’, याची माहिती समोर आलेली नाही. ज्‍या अधिकार्‍यांना फाशीची शिक्षा सुनावण्‍यात आली, ते भ्रष्‍टाचार आणि कर्तव्‍यात निष्‍काळजीपणा केल्‍याच्‍या प्रकरणी दोषी आढळले. आपत्तीमुळे झालेली हानी आणि मृत्‍यू यांसाठी त्‍यांना उत्तरदायी ठरवण्‍यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जुलैमध्‍ये उत्तर कोरियामध्‍ये भूस्‍खलन आणि पूर आला होता. या काळात सुमारे १ सहस्र लोकांचा मृत्‍यू झाला होता, तर ४ सहस्र घरे उद़्‍ध्‍वस्‍त झाली.
कोरोना महामारीच्‍या पूर्वी उत्तर कोरियामध्‍ये एका वर्षात १० जणांना फाशी दिली जात होती. आता प्रतिवर्षी सुमारे १०० जणांना फाशीची शिक्षा दिली जात आहे. जुलैमध्‍ये सरकारने ३० अल्‍पवयीन विद्यार्थ्‍यांना जाहीरपणे गोळ्‍या घातल्‍या होत्‍या. या विद्यार्थ्‍यांवर शत्रूराष्‍ट्र दक्षिण कोरियामध्‍ये बनवलेल्‍या मालिका पाहण्‍याचा आरोप होता.

संपादकीय भूमिका 

भारतात अशा प्रकारची शिक्षा सुनावण्‍यास चालू केले, तर प्रतिदिन शेकडो लोकांना आतंकवाद, जिहाद, भ्रष्‍टाचार, बलात्‍कार, हत्‍या, नक्षलवाद, दरोडे, लव्‍ह जिहाद, लँड जिहाद, देशद्रोह आदी गुन्‍हांमध्‍ये फाशी द्यावी लागेल !