मयूरभंज (ओडिशा) : येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मयूरभंज जिल्ह्यातील एका न्यायालयाने ३५ वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना जानेवारी २०१९ मध्ये बडासाही पोलीस ठाण्याच्या सीमेतील एका गावात घडली. (अशा प्रकरणांत जलद गती न्यायालयात खटला का चालवला जात नाही ? – संपादक) ही मुलगी घरी एकटीच असतांना आरोपीने मुलीला बिस्किटांचे आमिष दाखवले आणि तिला सायकलवरून जवळच्या जंगलात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तो तिला तेथेच सोडून पळून गेला.
९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या ६२ वर्षीय वृद्धाला २० वर्षांचा कारावास
कंधमाल जिल्ह्यातील फुलबनी येथे अशाच एका प्रकरणात एका ६२ वर्षीय वृद्धाला २० वर्षांच्या कारावाची शिक्षा सुनावण्यात आली. मार्च २०२१ मध्ये ९ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटी असतांना त्या व्यक्तीने तिथे जाऊन तिला ओढत दुसर्या खोलीत नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. न्यायालयाने दोषीला १५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडितेच्या पालकांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश जिल्हा विधी साहाय्य प्राधिकरणाला देण्यात आला आहे.