1400 Girls Abused In UK : ब्रिटनमध्‍ये १६ वर्षांच्‍या कालावधीत १ सहस्र ४०० मुलींचे लैंगिक शोषण

  • नराधम प्रामुख्‍याने पाकिस्‍तानी वंशाचे मुसलमान

  • आतापर्यंत ३७ जण दोषी

लंडन – ब्रिटनमधील सध्‍या रॉदरहॅम शहरात २० वर्षांपूर्वी अल्‍पवयीन मुलींवर झालेल्‍या लैंगिक शोषणाच्‍या प्रकरणांचे खटले चालू आहेत. त्‍याच्‍या अंतर्गत २० वर्षांपूर्वी एका १४ वर्षीय मुलीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या प्रकरणी ४२ वर्षीय वलीद अली याला ५ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे.

१. ब्रिटनच्‍या या तपास यंत्रणेनुसार वर्ष २००३ आणि २००४ या कालावधीत वलीद अली याने रॉदरहॅममध्‍ये एका १४ वर्षांच्‍या मुलीवर पाशवी लैंगिक अत्‍याचार केले.

२. या भीषण घटनेनंतर पीडितेने जवळपास २० वर्षे तिच्‍यावर झालेला आघात दाबून ठेवले. तथापि वर्ष २०२१ मध्‍ये तिने ‘ऑपरेशन स्‍टोव्‍हवूड’ पथकासमोर तिच्‍यावर झालेल्‍या लैंगिक अत्‍याचाराचा खुलासा केला.

३. ११ आणि १२ सप्‍टेंबर या दिवशी शेफील्‍ड क्राऊन न्‍यायालयाने ऑपरेशन स्‍टोवुड’च्‍या अंतर्गत ७ जणांना दोषी घोषित केले. या नराधमांनी २० वर्षांपूर्वी ११ ते १५ वयोगटातील मुलींचे लैंगिक शोषण केले होते.

मुलींवरील अत्‍याचारांच्‍या अन्‍वेषणासाठी ‘ऑपरेशन स्‍टोव्‍हवुड’

वर्ष १९९७ ते २०१३ या १६ वर्षांच्‍या कालावधीत रॉदरहॅमध्‍ये साधारण १ सहस्र ४०० मुलींचे लैंगिक शोषण आणि त्‍यांची तस्‍करी करण्‍यात आली, तसेच काहींची हत्‍याही करण्‍यात आली. अ‍ॅलिक्‍सिस जे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली या प्रकरणांची स्‍वतंत्र चौकशी करण्‍यात आली. या प्रकणांमध्‍ये आतापर्यंत ३७ जण दोषी आढळले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने पाकिस्‍तानी वंशाचे मुसलमान आहेत. अल्‍पवयीन मुलींचे मधील लैंगिक शोषण प्रकरणांचे अन्‍वेषण करण्‍यासाठी तेथील पोलीस दलाने ‘ऑपरेशन स्‍टोव्‍हवुड’ मोहीम राबवली आहे.

संपादकीय भूमिका

आता युरोपीय देशातील मुली आणि महिला वासनांध मुसलमानांच्‍या शिकार बनत आहेत, हे लक्षात घ्‍या !