कारसेवकांना जाळणार्या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालायकडून जामीन
वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या घटनेतील दोषी असणार्या ८ धर्मांध मुसलमानांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या घटनेतील दोषी असणार्या ८ धर्मांध मुसलमानांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
मुर्जा यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धावरून रशियावर टीका केली होती, तसेच त्यांनी रशियन सैन्याविषयी खोटी माहिती प्रसारित करून एका देशविरोधी संघटनेला समर्थन दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
वर्ष २०१४ मधील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा ११ एप्रिल या दिवशी अंतिम निकाल लागला. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी तुमसर शहरातील रामकृष्णनगर येथे रहाणारे संजय सोनी, पूनम सोनी, ध्रुमिल सोनी या एकाच कुटुंबातील तिघांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती.
तमिळनाडूच्या डिंडीगुल जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मणीकंदन यांनी ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा देणार्या न्यायाधिशांची जीभ कापण्यात येईल’, अशी धमकी दिली आहे.
साक्षीदार फितूर असतांनाही अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणार्या सद्दाम शहा याला २५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.एस्. हातरोटे यांनी सुनावली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील माधव बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
तृणमूल काँग्रेस किती खालच्या पातळीचे राजकारण करत आहे, हे यातून दिसून येते. असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक आहे !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये एका सभेत ‘मोदी आडनावेचे सगळे जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी त्यांना सुरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
भालावली, राजापूर येथील युवतीवरील अत्याचाराचे प्रकरण रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील भालावली येथील अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत आणि वारंवार तिच्यावर अतिप्रसंग करणार्या नीलेश देवजी गुरव या ३३ वर्षीय तरुणाला रत्नागिरी जिल्हा पॉक्सो न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि २६ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. Ratnagiri News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला 20 … Read more
भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
चोरी, घरफोडी, तसेच जबरी चोरी करणार्या सराईतांनाही पकडल्यानंतर त्यांना गंभीर शिक्षा न झाल्याने ‘काही होत नाही’, या अविर्भावात गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत आहेत.