देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी पुणे, नगर, जालना येथे निवेदन देण्यात आले !

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे.

पुणे येथील ओशो आश्रमातील २ भूखंड आश्रम विश्‍वस्तांकडून विक्रीला !

दळणवळण बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आश्रमाची हानी झाली. खर्च वाढल्याने आश्रमाला पैशाची गरज असल्याने भूखंड विक्रीला काढल्याचे ट्रस्टने सांगितले.

पुणे येथील पोलीस निरीक्षकासह तिघांना १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !

पुणे कॉसमॉस बँक सायबर आक्रमणातील आरोपी सुमेर शेख याला दुबईमध्ये अटक !

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरून कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्ट्रॉनिक माहिती चोरली होती. या माहितीचा वापर करून खोटे ए.टी.एम्. कार्ड बनवले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्रश्‍नसंच सिद्ध करण्याच्या कामासाठी प्राध्यापकांची टाळाटाळ !

प्रश्‍नसंच काढण्याच्या कामात टाळाटाळ करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाईचा प्रस्ताव परीक्षा प्रमाण मंडळापुढे सादर केला जाईल, असे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.

मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

चोराच्या उलट्या बोंबा ! हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना कोणी ही वस्तूस्थिती उघड करत असेल तर ते चूक कसे ?

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या व्हिडिओ प्रकरणी श्री श्री रविशंकर यांना पुणे पोलिसांची नोटीस !

पुराव्यांकडे दुर्लक्ष करून काही पुरो(अधो)गामी आणि परिवर्तनवादी विनाकारण गुरु-शिष्य या नात्यावर आक्षेप घेत स्वतःचे घोडे पुढे दामटणे अयोग्य आहे, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते.

यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या आरोग्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

स्थायी समितीने महापालिकेच्या निधीतून आणि खासगी भागीदारीतून शहरातील आरोग्यव्यवस्था सशक्त करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.

पुणे येथील कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या तळई उद्यानाची दुर्दशा !

सिंहगडावर येणार्‍या पर्यटकांना विरंगुळा म्हणून वन विभागाने अनुमाने १ कोटी रुपये व्यय करून बांधलेले तळई उद्यान गेल्या ६ वर्षांपासून धूळ खात पडून आहे.

अंगारकी चतुर्थीला पुणे येथील मोरया गोसावी गणपति मंदिर दर्शनास बंद रहाणार !

कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी यांमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ मार्च या दिवशी बंद रहाणार आहे.