भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांविरोधात पुणे येथे खंडणी आणि फसवणूक यांचा गुन्हा नोंद
५ कोटी ६० लाख रकमेपैकी ३ कोटी ९२ लाख रुपये तक्रारदाराने वेळोवेळी दिले; परंतु तरीही त्याचा ताबा त्यांना मिळाला नाही.
५ कोटी ६० लाख रकमेपैकी ३ कोटी ९२ लाख रुपये तक्रारदाराने वेळोवेळी दिले; परंतु तरीही त्याचा ताबा त्यांना मिळाला नाही.
कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांवर ‘प्लाझ्मा’ ही प्रभावी उपचारपद्धत आहे; पण ते दान करणारे दातेच सापडत नाहीत. कोरोनामुक्त होऊन २८ दिवस झालेल्या व्यक्तींनी रक्तपेढीत ‘प्लाझ्मा’ दान करावा, असे आवाहन अन्न आणि आरोग्य प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. दिनेश खिंवसरा यांनी केले आहे.
आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करतांना पोलिसांनी प्रतीक भावसार या तरुणाला अटक केली.
कोंढवा खुर्द येथे ‘अॅमेनिटी स्पेस’च्या जागेवर ‘सिव्हीक कल्चरल आणि कम्युनिटी सेंटर’ या गोंडस नावाखाली होत असलेल्या अनधिकृत हज हाऊसला समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला आहे.
शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आंदेकर टोळीवर, तसेच पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने कोरोना काळजी केंद्र (कोविड केअर सेंटर) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
पिंपरी अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पहाटे ५ वाजता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. रात्री दुकाने बंद असल्याने मोठी हानी टळली आहे.
हॅकरकडून बिटकॉईनची मागणी पुणे, १० मार्च – येथील पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर आक्रमण झाल्याचे समोर आले असून अज्ञात परदेशी हॅकरने बिटकॉईनची (ऑनलाईन चलन) मागणी केली आहे. रॅन्समवेअरने आक्रमण केल्याचे उघड झाले आहे. (रॅन्समवेअरमध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो. या प्रकारच्या सायबर … Read more
पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना अधिकोषातील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ७ मार्चला रात्री अटक केली.
गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्याचा विसर पोलिसांना अन्य वेळी पडलेला असतो का, असा प्रश्न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?