श्री हनुमंत कथेनिमित्त ध्‍वजारोहण पार पडले ! 

पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज

झुरखेडा (जळगाव) – पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांचा श्री हनुमंत कथा आणि दिव्‍य दरबार २६ ते ३० डिसेंबर या काळात होणार आहे. त्‍या निमित्तच्‍या कार्यक्रमाचे ध्‍वजारोहण आणि महायज्ञासाठीच्‍या हवन मंडपाचे भूमीपूजन पार पडले.

या प्रसंगी महाराष्‍ट्रातील अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश अध्‍यक्ष प.पू. संत श्री गोपाल चैतन्‍यजी महाराज, राष्‍ट्रीय कोषाध्‍यक्ष महामंडलेश्‍वर प.पू. स्‍वामी जनार्दन हरि महाराज, कोषाध्‍यक्ष श्री श्‍यामचैतन्‍य महाराज, तसेच शिवालय संरक्षण समितीचे राष्‍ट्रीय प्रभारी बाबा महाहंसजी उपस्‍थित होते. या वेळी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रतापराव गुलाबराव पाटील, कथा आयोजक संदीप पाटील, हिंदु जनजागृती समितीचे यशवंत चौधरी, विनोद शिंदे उपस्‍थित होते.