महाराष्‍ट्र विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट !

राहुल नार्वेकर आणि नरेंद्र मोदी

मुंबई – महाराष्‍ट्र विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी ११ डिसेंबर या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहली येथे भेट घेतली. महाराष्‍ट्राच्‍या प्रगती आणि देशाच्‍या प्रगतीत महाराष्‍ट्राचा सहभाग याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घेतल्‍याच राहुल नार्वेकर यांनी म्‍हटले. याविषयीचा संदेश राहुल नार्वेकर यांनी स्‍वत:च्‍या ‘एक्‍स’ खात्‍यावरून प्रसारित केला आहे.

विकासाला चालना देण्‍यासाठी आणि लोकशाही बळकट करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्‍व आम्‍हाला प्रेरणा देत असल्‍याचे राहुल नार्वेकर यांनी त्‍यांच्‍या संदेशात म्‍हटले आहे.