मीरारोड दंगल प्रकरणातील १४ मुसलमान आरोपींना जामीन !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – जानेवारी २०२४ मध्‍ये अयोध्‍येतील श्रीराम मंदिरामध्‍ये प्रभु श्रीरामाच्‍या मूर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला मीरारोड येथे हिंदूंनी काढलेल्‍या मिरवणुकीवर मुसलमानांनी आक्रमण केले होते. या प्रकरणी १४ मुसलमान आरोपींचा जामीन मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नुकताच संमत केला आहे. हे आक्रमण पूर्वनियोजित असल्‍याची शक्‍यता न्‍यायालयाने नाकारत ‘आरोपींना आणखी पोलीस कोठडीत ठेवण्‍याची आवश्‍यकता नाही’, असे म्‍हटले. न्‍यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्‍या एकलपिठाने हा जामीन संमत केला.