नगर – गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच देहली आणि केरळ येथे हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. या हत्या करणारे, त्यांच्याकडून हत्या करवून घेणारे सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नगर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोरोना काळातील सर्व नियम पाळून येथील तहसीलदार गृह शाखा आर्.जी. दिवाण यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना समितीचे रामेश्वर भूकन, परमेश्वर गायकवाड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्ञानेश्वर बेरड, सुरेश नाट हे उपस्थित होते.
जालना – येथील उपजिल्हाधिकारी अंकुशराव पिनाटे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींनी निवेदन दिले.
पुणे – शिरूर (जिल्हा पुणे) भाजपच्या वतीने शिरूर येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिरूर येथील भाजप सरचिटणीस विजय नर्के, भाजप चिटणीस राजेंद्र महाजन, सुनील गुप्ता, राजू चोथे आदी उपस्थित होते.