मुंबई – मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री साहाय्य निधी पक्षाच्या प्रमुखपदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी याविषयी नियुक्तीपत्र काढले आहे. डॉ. नाईक हे यापूर्वी धर्मादाय रुग्णालयांकडून देण्यात येणार्या आर्थिक साहाय्य कक्षाच्या राज्यस्तरीय कक्षाच्या प्रमुखपदाचे दायित्व पहात होते. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतांना या पदावर मंगेश चिवटे होते. ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जातात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री साहाय्य निधीचा कक्षाद्वारे अधिकाधिक नागरिकांना साहाय्यता केल्याचा विक्रम केला होता.