पुणे, १३ मार्च – येथील चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह तिघांविरोधात खंडणी आणि फसवणूक यांचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ५४ वर्षीय महिला अधिवक्त्याने तक्रार दिली आहे. तक्रारकर्त्याला मुंबईत सदनिका घ्यायची होती; म्हणून त्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या वरळीतील लोढा पार्क या इमारतीत वर्ष २०१३ मध्ये घराची नोंदणी (फ्लॅटचे बुकिंग) केली. ५ कोटी ६० लाख रकमेपैकी ३ कोटी ९२ लाख रुपये तक्रारदाराने वेळोवेळी दिले; परंतु तरीही त्याचा ताबा त्यांना मिळाला नाही.