कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील सिनेमा, नाटक चालू; परंतु सांस्कृतिक कार्यक्रम रहित !
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने सध्या नाट्यगृहांमध्ये तसेच मल्टिप्लेक्समध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने प्रयोग करण्यास अनुमती दिली आहे; परंतु त्याच जागी नियम पाळून सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम तसेच व्याख्याने घेण्यास बंदी घातली आहे.