अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई होणार !

शुल्क भरण्यासाठी आग्रह धरून कागदपत्रांचीसुद्धा अडवणूक करण्यात येत आहे, अशा तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारकडे, तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केल्या आहेत.

कांदळी (जिल्हा पुणे) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन !

याविषयीची माहिती श्री रामचंद्र देव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुण पिढीला भावतील याची विरोध करणार्‍यांना भीती ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले विचार तरुण पिढीला भावतील, याची लांगूलचालनाचे राजकारण करणार्‍यांना भीती वाटते म्हणून त्यांचा विरोध !

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आणि मळवली रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव !

राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांच्याकडे वेल्हे तालुक्याचे नाव पालटून राजगड ठेवावे, अशी मागणी केली होती.

पुणे येथील मावळ तालुक्यातील ६५ नागरिकांना विषबाधा !

मावळ तालुक्यातील शिवली आणि भाडवली या २ गावांतील ६५ नागरिकांना स्थानिक धार्मिक उत्सवात बनवलेल्या प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व लोकांनारुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

परीक्षा देण्यासाठी बनावट (डमी) विद्यार्थ्याला बसवले !

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीमुळे दिवसेंदिवस मुले संस्कारहीन बनत आहेत. बनावट विद्यार्थी परीक्षेला बसवण्याचे प्रकार वारंवार घडणे, हे शिक्षणक्षेत्राला लज्जास्पद आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबतील.

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना हानीभरपाईसाठी ८ कोटी संमत !

तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाकडून साहाय्य मिळण्याच्या प्रतीक्षेत होते; मात्र आमदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी असंख्य वेळा पाठपुरावा केल्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी हा निधी संमत केला आहे.

बनावट स्वाक्षरी करून महापालिकेची ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस !

स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून पालिका कर्मचार्‍याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

छटपूजेत अडथळा आणून धार्मिक भावना दुखावणार्‍या साहाय्यक आयुक्तांवर कारवाई करा ! – लालबाबू गुप्ता, विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष

अशी मागणी का करावी लागते ? साहाय्यक आयुक्तांवर अगोदरच कारवाई का केली नाही ?

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील पोलीस भरती लेखी परीक्षेत उमेदवाराच्या मास्कमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस’ सापडले !

परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची तपासणी चालू असतांना आरोपीच्या मास्कचे वजन अधिक असल्याचे लक्षात आले. त्याची तपासणी केली असता वरील प्रकार उघडकीस आला.