कांदळी (जिल्हा पुणे) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन !

प.पू. भक्तराज महाराज

पुणे – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणोत्सव २८ नोव्हेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण पक्ष नवमी या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने २७ नोव्हेंबर या दिवशीही काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयीची माहिती श्री रामचंद्र देव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने दिली.

२७ नोव्हेंबर या दिवशीचे कार्यक्रम खालीलप्रमाणे असतील

  • सकाळी ९ ते ११ – प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस अभिषेक आणि पूजा
  • दुपारी ३ ते सायं. ७ – प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक (पालखी सोहळा)
  • सायं. ७.३० ते रात्री ८ – प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीची नित्य नैमित्तिक आरती आणि श्री. अनिल कुटे अन् शिष्य परिवार यांची बासरी वादन सेवा
  • रात्री १० – प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनांचा कार्यक्रम

२८ नोव्हेंबर या दिवशीचे कार्यक्रम खालीलप्रमाणे असतील

  • सकाळी ९ ते ११ : प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस अभिषेक आणि पूजा
  • दुपारी १२.३० ते २.३० : महाप्रसाद