५ लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे पुजार्‍यांकडे सोपवावीत !

सर्वोच्च न्यायालयाने वर्ष १९७७ मध्ये निर्देश दिले आणि त्यावर वर्ष २००७ मध्ये, म्हणजे ३० वर्षांनी आदेश देणारे शासनकर्ते आणि प्रशासन हिंदुद्वेषीच ! न्यायालयाने आदेश देऊनही त्याची कार्यवाही होत नसेल, तर असे सरकार आणि प्रशासन काय कामाचे ?

अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त !

योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! आता सर्वच भाजपशासित राज्यांनी त्यांच्या राज्यातील मंदिरांवर लादण्यात आलेले सर्व कर रहित करावेत, असेच हिंदूंना वाटते !

ज्ञानवापी मशिदीचे संपूर्ण सर्वेक्षण १७ मे पूर्वी पूर्ण करा !

ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने १२ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला.

हिंदूंच्या सहिष्णुतेची पोचपावती !

आता आवश्यकता आहे ती भारताची अपकीर्ती करण्यासाठी कार्यरत असलेल्या साखळीचा भांडाफोड करण्याची आणि त्यांना दंडित करण्याची !

मशिदींवरील भोंग्यांविषयी न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई

ही कार्यवाही कुणीतरी आंदोलन केल्यावर असू नये, तर न्यायालयाच्या आदेशानंतर ती तत्परतेने झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

नाशिकमधील सप्तशृंग गडावर बिअरचे दुकान थाटण्याचा प्रशासनाचा डाव रणरागिणींनी उधळला !

बिअरच्या दुकानासह मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवरील बंदीचाही ठराव संमत !

… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

आदर्श उद्योगरत्न !

८४ वर्षीय रतन टाटा यांच्यासारखा उत्साहाचा खळखळता झराच भारत देशाला लाभला आहे. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व पुन्हा निर्माण होणे विरळाच ! त्यांच्यासमोर प्रत्येकाने नतमस्तक व्हायला हवे. देशाच्या यशोशिखरात मानाचा तुरा रोवणारी रतन टाटा यांच्यासारखी व्यक्ती प्रत्येक भारतियाच्या मनात अजरामर राहील, हे निश्चित !

उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळांवरील ११ सहस्र भोंगे उतरवले !

ध्वनीप्रदूषणाचा त्रास देशातील प्रत्येक नागरिकाला होत असतांना शासनकर्त्यांना जे शक्य आहे, ते करण्याचे धाडस ते का करत नाहीत ? जनतेने आता प्रत्येक राज्यातील शासनकर्त्यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !

उत्तरप्रदेश सरकारचे यश !

आक्रमक धर्मांधांना चुचकारून किंवा त्यांच्यासमोर मान तुकवून ते सुधारत नाहीत, तर त्यांच्या विरोधात तितक्याच आक्रमकपणे कायदा आणि नियम यांची कार्यवाही करून त्यांना वठणीवर आणता येते. हे उत्तरप्रदेश सरकारला जमल्यामुळे भोंग्यांमुळे भारतभरातील वातावरण ढवळून गेले असता उत्तरप्रदेशमध्ये मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. हिंदूंसाठी मात्र हे सुखावह चित्र आहे.