मशिदींवरील भोंग्यांविषयी न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘मशिदींवरील भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश असून ते सर्वांना लागू आहेत. त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात कार्यवाही करायला हवी. इतर राज्यांत काय झाले आहे, ते आम्ही पाहिले आहे, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांसमोर केले. मशिदींवरील भोंग्यांच्या अवैध वापराविरुद्ध कर्नाटकातील काही हिंदु संघटनांनी अभियान चालू केले आहे. या विरोधात या मुसलमान नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या मुसलमान नेत्यांनी मशिदींमध्ये जाऊन याचे पालन करण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आता या आदेशाचे पालन करण्यासाठी जनता आंदोलन करू लागल्यावर त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात मात्र काँग्रेसचे मुसलमान नेते पुढे आहेत. यातून त्यांना न्यायालयाविषयी किती आदर आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक) मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पोलीस, गृह विभाग आणि कायदा मंत्रालय यांच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन त्यांना निर्देश दिले.

संपादकीय भूमिका

ही कार्यवाही कुणीतरी आंदोलन केल्यावर असू नये, तर न्यायालयाच्या आदेशानंतर ती तत्परतेने झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !