हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या करमणुकीसाठी डिजिटल थिएटर उभारले !

अधिवेशाचा वेळ बहुमूल्य आहे. सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यानंतर आणि जनतेचे सहस्रो प्रश्न प्रलंबित असतांना एकत्रित बसून समोरासमोर चर्चा करून सोडवण्याऐवजी अधिवेशनातील वेळ मनोरंजनासाठी देणे, हे संतापजनक आहे. जनतेच्या कराच्या पैशातून चालणार्‍या अधिवेशनाच्या कालावधीत असा विचार करणारे…

विधीमंडळ अधिवेशन वादळी होण्याची शक्यता !

यंदाच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांचा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलेला अवमान, कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून झालेला वाद आणि राज्यभर लव्ह जिहादच्या विरोधात निघणारे..

चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही शाईफेक प्रकरणी ११ पोलिसांचे निलंबन !

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर १० डिसेंबर या दिवशी शाईफेक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी समता सैनिक दलाचे संघटक मनोज घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय ईचगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय ओवाळ यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्रात चाललेली झुंडशाही महाराष्ट्र शासन खपवून घेणार नाही ! – चंद्रकांत पाटील

मी भ्याड आक्रमणांना घाबरणार नाही. माझा दौर्‍याचा कार्यक्रम मी पूर्ण करणार आहे. महाराष्ट्रात चाललेली झुंडशाही महाराष्ट्र शासन खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस या सर्व घटनेची चौकशी करतील.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालून सीमावादाचा प्रश्‍न चिघळू देऊ नये !

सीमावादाचा प्रश्‍न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा; पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल, तर आमचेही उत्तर तितकेच तीव्र असेल, हे विसरू नका.

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित : कर्नाटकातूनही महाराष्ट्रात एकही बस नाही !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या पार्श्‍वभूमीवर आणि ६ डिसेंबरला महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगाव पथकर नाक्याजवळ झालेल्या आक्रमणानंतर महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

देहली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाची सत्ता !

देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २५० जागा असणार्‍या या महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला १३४ जागा मिळाल्या आहेत, तर सत्ताधारी पक्ष भाजपला १०४ जागा मिळाल्याने त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.

येत्या ६ मासांमध्ये ठाणे खड्डे आणि कचरा मुक्त करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मी एक जोरदार, तसेच धाडसी माणूस वाटलो. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. ठाण्यात सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली असून येत्या ६ मासांमध्ये ठाणे खड्डे आणि कचरा मुक्त करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिले.

हिंदु देवस्थान भूमी घोटाळ्यात मला राजकीय षड्यंत्रातून गोवण्याचा प्रयत्न ! – सुरेश धस, आमदार, भाजप

बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंदु देवस्थान भूमी घोटाळ्यात माझा आणि माझ्या कुटुंबाचा कसलाही संबंध नाही. राजकीय षड्यंत्रातून मला गोवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मी कोणत्याही अन्वेषणास सिद्ध आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा याची ‘ईडी’कडून चौकशी

‘त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ चित्रपट बनवण्यासाठी पैसे कुठून आले ?’, याविषयी ही चौकशी करण्यात आली. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आणि या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.