उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
पुणे – मी भ्याड आक्रमणांना घाबरणार नाही. माझा दौर्याचा कार्यक्रम मी पूर्ण करणार आहे. महाराष्ट्रात चाललेली झुंडशाही महाराष्ट्र शासन खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस या सर्व घटनेची चौकशी करतील. कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की, घटनेच्या चौकटीत न बसणारी कोणतीही कृती करू नका. सर्व विरोधकांनी या घटनेची निंदा करायला हवी, असे मी आवाहन करतो. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
शाईफेक करणार्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या घटनेपूर्वी पिंपरी चिंचवड दौर्यावर जातांना ‘नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. महात्मा फुले, आंबेडकर यांच्या संदर्भातील चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर पुणे, तसेच बारामती येथे ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली होती.