देशात कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर !

एप्रिल २०२२ नंतर २ डिसेंबर या दिवशी प्रथमच देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अगदी नगण्य नोंदवली गेली आहे. देशात २ डिसेंबरला कोरोनाचे केवळ २७५ रुग्ण आढळून आले आहेत.

विपरीत परिणाम करणार्‍या औषधांचे समाजात झालेले वितरण थांबवण्याची यंत्रणाच प्रशासनाकडे उपलब्ध नाही !

अधिकार्‍यांनी मान्य केले आहे की, एखादे औषध घातक ठरले, तर त्याचा पुरवठा आणि वितरीत केलेले औषध तात्काळ थांबवण्याच्या प्रक्रियेवर प्रशासनाचे नियंत्रण नाही.

रुग्णालयात रुग्णांना साधना शिकवणारे आणि भगवान श्रीकृष्णाचे अनुसंधान अनुभवणारे नगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. रवींद्र भोसले !

‘डॉ. भोसले हॉस्पिटल’ हे देवाने मला साधना करण्यासाठीचे माध्यम म्हणून माझ्यासाठी उभारले आहे’, असे मला वाटते. देव आपला पिता आहे. त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. त्यामुळे देवाने अनेक वेळा मला ‘जे आपल्यासाठी आवश्यक असते, तेच देव आपल्याला देत असतो’, याची प्रचीती दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर, शीव, ‘के.ई.एम्.’ आदी रुग्णालयांत मांजरांच्या वावरामुळे रुग्ण त्रस्त !

‘भिंतींवर सूचना लिहिल्या, म्हणजे स्वतःचे दायित्व संपले’, असे प्रशासनाने समजू नये ! प्राण्यांना रुग्णालयात अटकाव करण्यासाठी रुग्णालय प्रशासनानेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत !

अपघातग्रस्ताच्या साहाय्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना !

सर्व रुग्णालयांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत ‘आम्ही साहाय्यक व्यक्तीला अडवून ठेवणार नाही, तसेच त्यांच्याकडून पैसे घेणार नाही’, असा बोर्ड रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

कल्याण येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ६ नोव्हेंबरला रक्तदान शिबीर !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कल्याण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

देेहलीत वायूप्रदूषणाचा हाहा:कार !

शाळांना सूचित करण्यात आले आहे की, जर शक्य असेल, तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्गही ऑनलाइन घेतले जावेत. याखेरीज वर्गाबाहेरील प्रार्थना, मैदानी खेळ आदींसारख्या कार्यक्रमांवर पूर्णपणे निर्बंध आणण्यात आले आहेत.

(म्हणे) ‘राजधानीतील प्रदूषणासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दायित्व घ्यावे !’

प्रतिवर्षी देहलीवासियांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत असतांना त्यावर केंद्र सरकारचे साहाय्य घेऊन मूलगामी उपाययोजना न काढता आरोप करून केवळ राजकारण करण्याचा केजरीवाल यांचा हा प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागेल !

फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ !

दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या धुरामुळे हवेचा दर्जा खालावला असून त्यामुळे अनेक श्वसनाच्या विकारांना निमंत्रण मिळाले आहे. जंतूंचा संसर्ग, खोकला, दमा आदी आजारांचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.

कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता !

गेल्या काही मासांपासून कोरोना संक्रमण आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प झाले असले, तरी आता ओमिक्रॉन या विषाणूचा नवा प्रकार ‘एक्स.बी.बी.’ समोर आला आहे.