मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या नायर, शीव, ‘के.ई.एम्.’ आदी रुग्णालयांमध्ये मांजरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्ण असलेल्या कक्षात येऊन मांजरी घाण करत असल्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयांतील कर्मचारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.
१. महानगरपालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मधुमेहावर उपचार घेत असलेले सुभाष दिघे यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, नायर रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावर ९ क्रमांकाच्या कक्षात माझ्यासमवेत मधुमेहाच्या अनेक रुग्णांवर उपचार चालू होते. मधुमेहामुळे माझे दोन्ही पाय कापावे लागले आहेत. मी भरती असल्याच्या ठिकाणी कुत्रे आणि मांजरी फिरत होत्या. याविषयी तक्रार करूनही रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
२. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दहिसर येथील श्री. हर्षद पालये हे त्यांच्या वडिलांना उपचारांसाठी घेऊन गेले होते. तेथील वॉर्डमध्ये २० हून अधिक मांजरी फिरत होत्या. काही वेळा मांजरांनी रुग्णांच्या झोपण्याच्या ठिकाणी घाण केली. याविषयी कर्मचार्यांकडे तक्रार करूनही ते दुर्लक्ष करत होते, असे श्री. हर्षद पालये यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.
नायर रुग्णालयातील कर्मचार्यांचे रुग्णांना उर्मट उत्तर (म्हणे) ‘ते (प्राणी) आमचे नातेवाईक असल्याने आम्ही त्यांना बाहेर जाण्यास सांगत नाही !’
|
प्राण्यांच्या उच्छादाच्या समस्येवर सूचनाफलकाचा उतारा !परळ येथील ‘के.ई.एम्.’ रुग्णालयातही मांजरांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रुग्णालयाच्या भिंतीवर ठिकठिकाणी ‘रुग्णालयाच्या आवारात कुत्रे आणि मांजरी यांना खाऊ घालण्यास सक्त मनाई आहे’, ‘कुत्रे आणि मांजर यांचा वावर अतीदक्षता विभाग, ऑपरेशन विभाग, तसेच रुग्णालयाच्या विविध विभागांत वाढत आहे. तो थांबवणे आपल्या सर्वांचे दायित्व आहे’, आदी सूचना लावण्यात आल्या आहेत. (‘भिंतींवर सूचना लिहिल्या, म्हणजे स्वतःचे दायित्व संपले’, असे प्रशासनाने समजू नये ! प्राण्यांना रुग्णालयात अटकाव करण्यासाठी रुग्णालय प्रशासनानेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|