कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता !

नवी देहली – गेल्या काही मासांपासून कोरोना संक्रमण आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प झाले असले, तरी आता ओमिक्रॉन या विषाणूचा नवा प्रकार ‘एक्स.बी.बी.’ समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमण पुन्हा वेगाने वाढत असून यामुळे कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

१. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांच्या मते, काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते. यामागे ओमिक्रॉनचा नवा प्रकार ‘एक्स.बी.बी.’ असण्याची शक्यता आहे; परंतु ‘डेल्टा’ या विषाणू प्रकारासारखा तो जीवघेणा नसावा, असेही त्या म्हणाल्या. भारतीय तज्ञांचेही असेच मत आहे.

२. युरोप, उत्तर अमेरिका आणि आफ्रिका या खंडांमध्ये ओमिक्रॉनच्या ‘बीक्यू.१’ या प्रकारामुळे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे.

३. चीन, सिंगापूर, भारत आणि बांगलादेश यांसारख्या आशियाई देशांमध्ये ‘एक्स.बी.बी.’ या विषाणू प्रकारामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असून चीनमधील काही भागांमध्ये पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे.