राज्यात लवकरच मेडिकल बोर्डच्या माध्यमातून ४ सहस्र ५०० जागा भरणार ! – गिरीश महाजन, आरोग्यमंत्री

भरतीमध्ये आधुनिक वैद्यांची ३०० पदे भरली जाणार आहेत. ‘एम्.पी.एस्.सी.’मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार ‘मेडिकल बोर्ड’ सिद्ध करणार आहे.

स्वमग्न मुलांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र चालू करणार ! – डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री

प्रत्येक तालुक्यात पथके नियुक्त केली असून त्यांच्या वतीने स्वमग्नता आणि गतीमंदता या मेंदूविकारांविषयी विद्यार्थी अन् अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे वयांच्या बालकांची पडताळणी करण्यात आली आहे.

देशात पुन्हा मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्रशासन

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना अजून संपलेला नाही; पण भारत प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सिद्ध आहे. आम्ही सर्व संबंधितांना सतर्क रहाण्यास आणि दक्षता वाढवण्यास सांगितले आहे.

अधिष्ठाता आणि संबंधित आधुनिक वैद्य यांची विभागीय चौकशी करणार ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांतील सर्व शासकीय रुग्णालयांत येणार्‍या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर देणे अशक्य असते. तरीही ते देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

घाटकोपर येथील इमारतीला आग

घाटकोपर येथील पंतनगर भागातील ‘विश्वा ब्लॉक’ या इमारतीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भीषण आग लागली आणि इमारतीची दुरवस्था झाली.

कोरोना महामारीच्या काळात साधकाने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

कोरोना महामारीमुळे बाहेरील स्थिती गंभीर असतांनाही गुरुदेवांनी करवून घेतलेल्या या सर्व कृतींमुळे मला कसलेही भय वाटत नव्हते.

नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय !

खाटा वाढवल्यानंतर नियमानुसार मनुष्यबळही वाढवायला हवे होते; मात्र कर्मचार्‍यांची रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरली गेली नाहीत.

संभाजीनगर येथे १०५ जणांना गोवर !

मुंबई, भिवंडीपाठोपाठ शहरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ४ डिसेंबर या दिवशी शहरातील आकडा १०० च्या वर गेला असून गोवर झालेल्या संशयित बालकांची संख्या आता १०५ पर्यंत पोचली आहे. 

पुणे येथे ‘झिका’चा रुग्ण आढळला; दक्षतेचे आदेश !

पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या ६७ वर्षीय पुरुषाला ‘झिका’चा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. पुण्यात आल्यानंतर रुग्णाला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागला. रुग्णाने वैद्यकीय सल्ल्याकरता १६ नोव्हेंबर या दिवशी जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार चालू केले..

देशात कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर !

एप्रिल २०२२ नंतर २ डिसेंबर या दिवशी प्रथमच देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अगदी नगण्य नोंदवली गेली आहे. देशात २ डिसेंबरला कोरोनाचे केवळ २७५ रुग्ण आढळून आले आहेत.