(म्हणे) ‘राजधानीतील प्रदूषणासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दायित्व घ्यावे !’

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत:चे दायित्व झटकले !

नवी देहली – राजधानी देहलीत हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. या समस्येवरून सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देतांना देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. देहलीतील वायूप्रदूषण आणि हवेची खराब गुणवत्ता, या केवळ राजधानीच्याच समस्या नाहीत. या संदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दायित्व घ्यावे, असे ते म्हणाले.

ही समस्या केवळ पंजाब आणि देहली या राज्यांपुरती मर्यादित नाही. वायूप्रदूषणासाठी देहली आणि पंजाबमधील आप सरकारालाच दोषी धरता येणार नाही, असेही केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले.

संपादकीय भूमिका

  • असे वक्तव्य करणे, म्हणजे जनतेला होत असलेल्या त्रासाविषयी काहीच संवेदनशीलता नसल्याचेच लक्षण होय !
  • प्रतिवर्षी देहलीवासियांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत असतांना त्यावर केंद्र सरकारचे साहाय्य घेऊन मूलगामी उपाययोजना न काढता आरोप करून केवळ राजकारण करण्याचा केजरीवाल यांचा हा प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागेल ! केंद्र सरकारनेही या प्रकरणी लक्ष घालणे आवश्यक आहे !