नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

VIDEO : दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचा वैध मार्गाने प्रतिकार’ या विषयावर उहापोह !

छत्तीसगडमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती नष्ट करून आदिवासींचे धर्मांतर करण्यात येत आहे. जे आपल्याशी युद्धात जिंकले नाहीत, त्यांनी अशा प्रकारे आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

गडचिरोली येथे २ जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसर्मपण !

२५ मे या दिवशी १२ लाखांचे पारितोषिक असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांनी येथील पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे. रामसिंग उपाख्य सीताराम आत्राम आणि माधुरी उपाख्य भुरी उपाख्य सुमन मट्टामी अशी नक्षलवाद्यांची नावे आहेत.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या !

‘आणखी किती हत्या केल्यावर नक्षलवादाच्या विरोधात कारवाई होणार ?’, हे शासनकर्त्यांनी सांगावे !

गडचिरोली येथे पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या !

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना १४ मे या दिवशी उघडकीस आली. रामजी तिम्मा (वय ४० वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा : बाँबस्फोट प्रकरणातील नक्षली आरोपीला जामीन !

बाँबस्फोटासारखा गंभीर आरोप असतांना आरोपीला जामीन मिळणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

जहाल नक्षलवादी नर्मदा हिचा कर्करोगामुळे भायखळा कारागृहात मृत्यू !

नर्मदा हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथील ‘दंडकारण्य बंद’ची घोषणा केली आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे ।’ अशी भित्तीपत्रके गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात लावण्यात आली आहेत.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या !

संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !

माओवाद्यांचे जाळे नष्ट करण्याचा केंद्र सरकारचा सुरक्षादलांना आदेश !

केंद्रीय गृहमंत्रालयाशी संलग्न असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी म्हणाले, ‘‘माओवादी रणनीतीकार अनेक शहरांमध्ये सक्रीय राहून भूमीगत नक्षलवाद्यांना पाठिंबा देत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

भारतातील माओवादाचा शेवट ?

यांना ‘सरकारी यंत्रणा उलथवून स्वतःचे सरकार स्थापन करायचे आहे’. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटापर्यंत हे नक्षलवादी पुढे गेल्याचे अन्वेषणात उघड झाले. यावरून त्यांच्या लढ्याचे स्वरूप किती गंभीर आणि देशद्रोही स्वरूपाचे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे केंद्र शासनाने नक्षलवाद किंवा माओवाद समूळ नष्ट होण्याकडेच आता वाटचाल करावी !