
रांची – राज्यातील चतरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ नक्षलवाद्यांना ठार मारले. या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. या वेळी घटनास्थळावरून २ ‘एके ४७’ रायफली जप्त करण्यात आल्या. या भागात सुरक्षादलांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. ३ एप्रिलला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक चालू झाली. ही चकमक लातेहार, पलामू आणि चतरा या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागांतील लाव्हालौंगच्या रीमी गावालगत घडली. त्यात गौतम पासवान आणि चार्ली नामक नक्षलवादी मारले गेले. गौतम पासवान लातेहार, पलामू आणि चतरा या जिल्ह्यांत कारवाया करत होता.
Jharkhand: चतरा में सुरक्षाबलों की बड़ी उपलब्धि, मुठभेड़ में भाकपा माओवादी के पांच इनामी नक्सलियों को किया ढेर#JharkhandNews #Chatara #CPIMaoists @JharkhandPolicehttps://t.co/TaTigQG5C0
— Dainik Jagran (@JagranNews) April 3, 2023
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’