काबुल (अफगाणिस्तान) येथील मंदिरात नवरात्रोत्सवाचे आयोजन

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून तेथील लोकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आले असतांना काबुलमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंकडून नवरात्रोत्सव साजरा केला जात असल्याची एक चांगली बातमी आहे.

१३ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (सातवा दिवस)

शरद ऋतूतील कमलाप्रमाणे मुख असणारी; सर्व गोष्टी मिळवून देणारी सरस्वतीदेवी, नेहमी आमच्या मुखकमलाच्या जवळ उत्तम (ज्ञानाचा) वस्तूंचा संग्रह करो.

सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा !

सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री भवानीदेवीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिले होते.  

सप्तमीला श्री महालक्ष्मीदेवीची इंद्राणी मातृका रूपात अलंकार पूजा !

सप्तमीला श्री महालक्ष्मीदेवीची इंद्राणी मातृका रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर जोतिबा देवाची विशेष अलंकार रूपातील पूजा बांधण्यात आली होती. महालक्ष्मी मंदिरात अंबामातेचे हे अनोखे रूप पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

शक्तिदेवता !

कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया.

आदिशक्तीचे योगमाया स्वरूप आणि तिने केलेला असुरांचा नाश !

‘योगमाया’ श्रीविष्णूच्या श्रीरामावतारात सीता बनून आली आणि रावणासुराच्या बंधनात राहिली. साक्षात् आदिशक्तीला एका असुराच्या बंधनात रहाण्याचे काय कारण ? ‘हीच तिची माया आहे’, जी कुणीही समजू शकत नाही.

रतलाम (मध्यप्रदेश) येथे श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये विहिंपकडून अन्य धर्मियांना प्रवेशबंदी !

विश्‍व हिंदु परिषदेने येथील श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याविषयीची भित्तीपत्रके संपूर्ण शहरात लावण्यात आली आहेत.

१२ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (सहावा दिवस)

हे देवी नारायणी, तुला शरण आलेल्या दीन, दुःखी भक्तांचे तू रक्षण करतेस, तसेच त्यांची सर्व दुःखे नाहीशी करतेस, तुला आमचा नमस्कार असो.

हिंदु राष्ट्र स्थापण्या, जागर आदिशक्तीचा !

या नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष युवती शौर्यजागृती व्याख्यान

आदिशक्तीने ‘रक्तबीज’ असुराला कसे मारले ?

कालीने रक्तबिजाच्या शरिरातून बाहेर पडणारे सर्व रक्त प्यायला आरंभ केला. देवीने रक्तबिजाच्या शरिराचे एक एक अंग कापायला आरंभ केला आणि देवी काली ते कापलेले अंग खात होती. त्यानंतर कालीने संपूर्ण रक्तबिजाला खाऊन टाकले.