मुंबईतील काही नवरात्रोत्सव मंडळांना मुसलमानांकडून सहस्रावधी रुपयांच्या देणग्या !

मुंबई, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – मागील काही मासांमध्ये महाराष्ट्रात, तसेच देशभरात धर्मांध मुसलमानांकडून हिंदु युवतींना लव्ह जिहादच्या प्रेमाच्या फसव्या जाळ्यात अडकवण्याच्या घटना वाढत आहेत. हे लक्षात घेऊन ‘नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी गरबा खेळण्यामध्ये मुसलमानांना प्रवेश देऊ नका’, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र मुंबईतील काही नवरात्रोत्सवामध्ये मुसलमानांकडून मोठ्या रकमा देणगीच्या स्वरूपात नवरात्रोत्सव मंडळांना देण्यात आल्याच्या घटना आढळून आल्या आहेत.

१. दादर येथील एका स्थानिक नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी देणगीदारांची सूची लावण्यात आली होती. त्यामध्ये सर्वांत अधिक १० सहस्र रुपयांची देणगी एका मुसलमानाने नवरात्रोत्सवासाठी दिली होती.

२. या तुलनेत अन्य हिंदु देणगीदारांच्या देणग्या या अत्यल्प रकमेच्या होत्या. मुंबईतील अन्यही काही नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी मुसलमान व्यक्तींकडून उत्सवासाठी अधिक रकमेच्या देणग्या देण्यात आल्याचे आढळून आले.

संपादकीय भूमिका

‘एखाद्या उत्सवाप्रती श्रद्धा असल्याच्या भावनेतून देणगी देणे, हे हिंदूंशी चांगले संबंध ठेवणे यांतून होत आहे कि यामागे कोणते षड्यंत्र आहे ?’ हे पडताळणे आवश्यक आहे !