कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नवरात्रोत्सवानिमित्त हिंदूंना दिल्या शुभेच्छा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हिंदूंना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नवरात्र हा हिंदु धर्मातील सर्वांत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. या उत्सवामुळे श्री दुर्गादेवीने महिषासुरावर मिळवलेल्या विजयाचे आपल्याला स्मरण होते. नवरात्रोत्सवाकडे स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणूनही पाहिले जाते. (वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या नवरात्रीत ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवाद्यांचा नायनाट केल्यास त्या खर्‍या अर्थाने नवरात्रीच्या शुभेच्छा ठरणार ! – संपादक)

जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, नवरात्रोत्सव हिंदु समुदायाची संस्कृती आणि कॅनडाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत हिंदूंनी दिलेले अमूल्य योगदान यांचे स्मरण करण्याची आपल्याला संधी देते.