शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर बांधा ! – स्थानिकांची मागणी

शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळचे प्रवेशद्वार) या वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली. या वेळी पूजण्यात आलेली मूर्ती ही देवीच्या भक्तांना चालू वर्षी मे मासात याच परिसरात नदीच्या काठी सापडली होती.

चोरी आणि खंडणी यांमध्ये सहभागी असलेला पोलीस हवालदार विकास कौशिक सेवेतून बडतर्फ

सराईत चोराने हवालदार विकास कौशिक यांचे कारनामे सांगेपर्यंत ते इतर पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?

गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात हवेतून हवेत मारा करणार्‍या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय वायू दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (एल्सीए) एल्एस्पी-७ तेजसने २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ (दृष्टीक्षेपाच्या पलीकडील अस्त्र) या हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले.

‘इस्रो’ चंद्रावर पोचली, ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्‍या डबक्‍यातच ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे पुढे नमूद करतात की, प्रत्‍येक कामाचा आरंभ हा देवतेच्‍या आशीर्वादाने करणे, त्‍यातील अडथळे दूर होण्‍यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे.

बलात्काराला विरोध करणार्‍या अल्पवयीन नेपाळी हिंदु मुलीची महंमद अब्बासकडून हत्या !

हिंदु मुलींच्या प्राणाचे कोणतेच मोल नसलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या राज्यात यापेक्षा वेगळे काय होणार ? बलात्कार्‍यांना तात्काळ फाशीची शिक्षा देणारा कायदा असण्याची अनिवार्यता

पुणे येथील ‘कबीर कला मंच’शी संबंधित कार्यकर्ती ज्योती जगताप हिचा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज !

ज्योती जगतापच्या विरोधातील पुरावे पुरेसे असून ती भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने रचलेल्या मोठ्या कटाचा भाग असल्याचे मानले जात होते.

उत्सवांमागील धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी धर्मशिक्षण असणे आवश्यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी होतो अन् युवा पीढी सनातन धर्मापासून दूर जाते.

अजमेर (राजस्थान) येथे विद्यार्थिनींची कंबर आणि नितंब यांचा आकार मागणार्‍या शाळेच्या विरोधात पालकांचा संताप !

विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या खेळाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांच्याकडे कानाडोळा करून अशा प्रकारे अनावश्यक माहिती मागवणार्‍या शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हायला हवी !

अहिल्यानगर येथून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !

हिमाचल प्रदेशातील अनी येथील ५ हून अधिक इमारती कोसळल्या !

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.