मुंबई विमानतळावरील विमानात बाँब ठेवल्याचा दूरभाष !

संपूर्ण विमानतळाची पडताळणी करण्यात आली. तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठकही आयोजित करण्यात आली. पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता वरील प्रकार समोर आला.

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथील मंदिराच्या दानपेटीत मिळाला १०० कोटी रुपयांचा धनादेश; मात्र बँक खात्यात अवघे १७ रुपये !

देवाची अशी फसवणूक करणारे या देशात आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

चीननेच भारताकडे केली होती द्विपक्षीय बैठकीची मागणी ! – भारत

भारताकडून नव्हे, तर चीनकडूनच द्विपक्षीय बैठकीची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी येथे पत्रकारांना दिली.

बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी कार्यकर्त्याचा गळा पकडून दिला धक्का !

कार्यकर्त्यार्ने दारू पिऊन धक्काबुक्की केल्याचा यादव यांचा दावा !

मणीपूर हिंसाचाराचे खटले गौहत्ती (आसाम) येथे चालणार

मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नोंदवलेले खटले आसामची राजधानी गौहत्ती येथे स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

चीनने सहस्रो कि.मी. भूमी हिसकावली, तरी पंतप्रधान एक इंचही भूमी गेली नसल्याचा दावा करतात ! – राहुल गांधी

वर्ष १९६२ च्या युद्धात चीनने भारताची ३८ सहस्र चौरस किलोमीटर भूमी बळकावली. यावर राहुल गांधी यांचे पणजोबा आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी संसदेत, ‘जेथे गवताची पातीही उगवत नाहीत, अशीच भूमी चीनने बळकावली आहे’, असे म्हणत याचे समर्थन केले होते.

मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारताला उशिरा स्वातंत्र्य मिळाले ! – पू. भिडेगुरुजी

मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारत देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हिंदूंची मानसिकता अशी आहे की, पैसे फेकले की, ते कशालाही सिद्ध होतात.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसांचा गोवा दौरा आटोपून देहलीला मार्गस्थ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २४ ऑगस्ट या गोवा दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर, वेर्णा येथील श्री महालसा मंदिर आणि जुने गोवे येथील बासिलिका बॉम जीसस चर्च यांना भेटी दिल्या.

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर बांधा ! – स्थानिकांची मागणी

शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळचे प्रवेशद्वार) या वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली. या वेळी पूजण्यात आलेली मूर्ती ही देवीच्या भक्तांना चालू वर्षी मे मासात याच परिसरात नदीच्या काठी सापडली होती.

चोरी आणि खंडणी यांमध्ये सहभागी असलेला पोलीस हवालदार विकास कौशिक सेवेतून बडतर्फ

सराईत चोराने हवालदार विकास कौशिक यांचे कारनामे सांगेपर्यंत ते इतर पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?