ओंकारेश्‍वर   (मध्यप्रदेश) येथे आद्य शंकराचार्य यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ मूर्तीचे अनावरण !

ओंकारेश्‍वर ही आद्य शंकराचार्य यांची ज्ञान आणि गुरु भूमी आहे. येथेच त्यांना त्यांचे गुरु गोविंद भगवत्पाद भेटले होते. येथेच त्यांनी ४ वर्षे राहून विद्या अध्ययन केले.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब चॅनल ‘स्ट्रिंग रिव्हील्स’वर अन्याय्य बंदी !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी सामाजिक माध्यमे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची खाती मात्र बंद करून त्यांचा आवाज दाबतात. या दुटप्पीपणाच्या विरोधात आता हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवून त्यांच्यावर बहिष्काराचे अस्त्र उगारणे आवश्यक आहे !

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !

एन्.आय.ए.ने कॅनडात लपलेल्या ४३ आतंकवादी आणि गुंड यांचा तपशील प्रसारित करून मागितली माहिती !

कॅनडा सरकारकडे या आतंकवाद्यांवर कारवाई करून भारतात सोपवण्याची मागणी करूनही ती नाकारण्यात आली आहे. यातून कॅनडाचे सरकार कशा प्रकारे आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहे, हे लक्षात येते !

सलमान खान आणि शाहरूख खान यांच्‍यावर श्री गणेशमूर्तीची स्‍थापना अन् आरती केल्‍यावरून टीका

अभिनेते सलमान खान यांची बहीण अर्पिता हिच्‍या घरी श्री गणेशाचे आगमन झाल्‍यावर तेे सहकुटुंब आरती करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित झाला होता. त्‍यानंतर त्‍यांच्‍या धर्मबांधवांनी त्‍यांच्‍यावर सामाजिक माध्‍यमांतून ‘इस्‍लामला लागलेला कलंक’ अशा शब्‍दांत टीका केली.

शाळांमधून चालू असलेला इस्‍लामी प्रचार रोखा ! – जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ

विद्यालयामध्‍ये इस्‍लामी आतंकवाद पसरवून त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचा हा प्रकार आहे ! गोव्‍यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्‍या पाहिजेत अन्‍यथा या षड्‍यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्‍याची शक्‍यता आहे. गोव्‍यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्‍वेषण करून विद्यार्थ्‍यांमध्‍ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्‍याचे षड्‍यंत्र रोखायला हवे.

(म्‍हणे) ‘सनातन धर्म नष्‍ट केला, तर अस्‍पृश्‍यता आपोआप नष्‍ट होईल !

जातींमुळे होणारे भेदभाव संपवण्‍यासाठीच सनातन धर्म नष्‍ट केला पाहिजे. जर सनातन नष्‍ट झाले, तर अस्‍पृश्‍यताही नष्‍ट होईल, असे पुन्‍हा एकदा सनातन धर्मविरोधी विधान राज्‍याचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी यांनी केले. ते राज्‍यपाल आर्.एन्. रवि यांच्‍या विधानावर प्रत्‍युत्तर देतांना बोलत होते.

कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट वीज निःशुल्‍क देण्‍याचा तेलंगाणा सरकारचा आदेश !

तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकताच कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्‍क वीज देण्‍याचा आदेश दिला.

आद्यशंकराचार्य यांच्‍या भव्‍य पुतळ्‍यासह ‘शंकर संग्रहालया’ची उभारणी !

ओंकारेश्‍वर (मध्‍यप्रदेश) येथे आज ‘एकात्‍म धाम’चे उद़्‍घाटन

महिला आरक्षण विधेयकावर संसदेत दिवसभर चर्चा : काँग्रेससह अनेक पक्षांचा पाठिंबा

या विधेयकाद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा येथे ३३ टक्के जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या विधेयकावर चर्चा करतांना अनेक पक्षांनी त्याला पाठिंबा दिला.