बेंगळुरू येथे बसमध्ये मुसलमान वाहकाला महिलेने गोल टोपी काढण्यास भाग पाडले !

‘तुमचा धर्म घरी किंवा मशिदीत पाळा’ या शब्दांत महिलेने सुनावले !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे एका महिला प्रवाशाने बसमधील मुसलमान वाहकाने (कंडक्टरने) गोल टोपी घालण्यावर आक्षेप घेत त्याला टोपी काढण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. महिलेने वाहकाला टोपी काढण्यास सांगितल्यावर दोघांमध्ये प्रथम वाद झाला; मात्र नंतर वाहकाने टोपी काढल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या महिला प्रवाशाने मुसलमान वाहकाला ‘तुम्हाला तुमचा धर्म पाळायचा असेल, तर घरी किंवा मशिदीत जा’, असे सुनावले.

मुसलमान वाहकाने कामावर असतांना गणवेशासह गोल टोपी घातल्याने या महिलेने गोल टोपीवर आक्षेप घेतला. तिने वाहकाला विचारले, ‘गणवेशासह टोपी घालण्याची अनुमती आहे का? ही टोपी तुमच्या गणवेशाचा भाग आहे का?’ त्यावर मुसलमान वाहकाने उत्तर दिले, ‘मी अनेक वर्षांपासून टोपी घालत आहे आणि यापूर्वी कुणीही त्यावर आक्षेप घेतला नव्हता.’ त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाहकाने सांगितले, ‘मी टोपी घालू शकतो.’ (असा उद्दामपणे करणार्‍यांना नोकरीतून बडतर्फ करण्यासाठी जनतेने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक) तेव्हा त्या महिलेने ‘तुम्हाला नियम नीट ठाऊक नाहीत. टोपी काढून तुम्ही नियमांचे पालन केले पाहिजे.’ अंततः या वाहकाने टोपी काढली. (हा मुसलमान बसवाहक पुन्हा टोपी परिधान करणार नाही, याची शाश्‍वती कुणी देणार का ? यासाठी अशांना नियामानुसार शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बसवाहक गणवेशामध्ये असतांना गोल धार्मिक टोपी घालू शकत नाही, असा नियम असतांना संबंधित अधिकार्‍यांना हे दिसत नव्हते कि ते भीतीपोटी मूग गिळून गप्प होते ?