जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील एका मुलगा ऑनलाईन खेळाच्या आहारी गेल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याची घटना समोर आली आहे. तो थरथरत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.‘फ्रीय फायर’सारख्या खेळाच्या तो आहारी गेल्याने त्यांची ही स्थिती झाली आहे. ऑनलाईन खेळांमध्ये पराभूत झाल्यावर ते स्वीकारता येत नसल्याने एकतर ही मुले आत्महत्या करतात किंवा मानसिक संतुलन गमवतात. एका अभ्यासानुसार ऑनलाईन खेळ खेळणारी मुले आठवड्यातील सरासरी ४ रात्री खेळ खेळतात. त्यांपैकी ३६ टक्के मुले रात्री झोपायला मुद्दामहून उशीर करतात.
🚨: Toxicities of Online Gaming: Child shivers – admitted for counselling after addiction to #OnlineGaming.
A case of how online games like PUBG and Free Fire are affecting youngsters has come to the fore from Rajasthan’s Alwar where a 15-year-old boy began playing these games… pic.twitter.com/NhYZ0x7Z7I
— truth. (@thetruthin) July 12, 2023
संपादकीय भूमिकाविज्ञानाने केलेल्या प्रगतीचा लाभ घेतांना त्याचा अतिरेक केल्यावर काय होते, हेच या घटनेतून लक्षात येते ! यासाठी अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर कुणी करावा आणि कुणी करू नये, असेही नियम असणे आवश्यक आहेत ! |