तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निवडणुकीत आश्वासन !
(‘आयटी पार्क’ म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात रोजगार देणारे केंद्र)
भाग्यनगर (तेलंगाणा) : सध्या तेलंगाणामध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. याच्या प्रचाराच्या वेळी सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर मुसलमान युवकांसाठी स्वतंत्र ‘आयटी पार्ट’ उभारण्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी ‘आमचे सरकार मुसलमानांना निवृत्तीवेतन देत आहे आणि त्यांच्यासाठी निवासी शाळाही उघडल्या आहेत. त्यामुळे मुसलमानांनी आम्हाला मतदान करावे’, असे आवाहन केले आहे. ते महेश्वरम् येथील सभेत बोलत होते.
१० वर्षांत अल्पसंख्यांकासाठी १२ सहस्र कोटी रुपये केले खर्च !
मुख्यमंत्री राव पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी १२ सहस्र कोटी रुपये खर्च केले आहेत, तर काँग्रेसने तिच्या १० वर्षांच्या काळात केवळ २ सहस्र कोटी रुपये खर्च केले होते. (बहुसंख्य हिंदूंसाठी किती रुपये खर्च केले ?, हे राव सांगतील का आणि राज्यातील हिंदू त्यांना विचारतील का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|