|
लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेश पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने १० संशयित जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात नुकताच गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. यामध्ये आदिल उर रहमान अशरफी, अबू हुरैरा गाझी, नजीबुल शेख, महंमद रशीद, कफीलुद्दीन, अझीम, अब्दुल अवल, अबू सालेह, अब्दुल गफ्फार आणि अब्दुल्ला गाझी यांचा समावेश आहे. या सर्वांवर भारतात मशिदी बांधण्यासाठी विदेशातून अवैधरित्या पैसा मिळवणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना भारतात अवैधपणे वसवणे, देशविरोधी कारवाया करणे इत्यादी आरोप आहेत. यांतील बहुतेक आतंकवादी ‘दारुल उलूम देवबंद’शी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
१. विदेशातून मागवलेला हा पैसा हवालाच्या माध्यमातून नजीबुल शेखपर्यंत पोचवला जात होता. नजीबुल शेख याचे सहारनपूरमधील दारुल उलूम देवबंदजवळ टोपी आणि सुगंधी द्रव्ये यांचे दुकान आहे.
२. नजीबुलने बांगलादेशी नागरिक अतिक उर रहमान याला त्याचा साथीदार म्हणून ठेवले होते. अतिक उर रहमान याने बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्ड मिळवले होते.
३. आतंकवाद्यांची ही टोळी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना भारतात घुसवून त्यांची भारतीय कागदपत्रे बनवत होती. या घुसखोरांना देहली, मुंबई, बेंगळुरू, आसाम इत्यादी भागांत स्थायिक केले जात होते.
४. पोलिसांनी या आतंकवाद्यांकडून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणे, भ्रमणभाष, एटीएम कार्ड, संयुक्त अरब अमिरातचे चलन, सिमकार्ड, आधारकार्ड, मदरसा कार्ड आणि पारपत्र (पासपोर्ट) जप्त केले आहेत.
५. या प्रकरणात अटक केलेल्या अबू हुरैरा या आतंकवाद्याचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. तो स्वत:ला ‘गाझी’ म्हणवत असून तो ‘दारुल उलूम देवबंद’च्या मशिदीत रहात होता.
संपादकीय भूमिकावाढता आतंकवाद आणि आतंकवादी कृत्ये रोखण्यासाठी आतंकवाद्यांना तात्काळ फाशी देणारा कायदा हवा, हे सरकारने आतातरी जाणावे ! |