‘ऑगर’ यंत्र झाले नादुरुस्त !
उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील बोगद्यात १४ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न चालू आहेत. या बचावकार्यात अनेक अडथळे येत असून खोदकाम करणारे ‘ऑगर’ यंत्र आतील लोखंडी संळ्यांमध्ये अडकल्याने नादुरुस्त झाले आहे. ते पुन्हा कार्यरत होऊ शकत नसल्याने आता बोगद्याच्या वरच्या बाजूने खोदकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणा आणण्यात आली आहे. या स्थितीमुळे बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी अजूही बराच वेळ लागू शकतो. सध्या अडकलेले कामगार १० मीटर अंतरावर आहेत.
एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, ज्या ऑगर यंत्राद्वारे खोदकाम केले जात होते, त्याचे ब्लेड तुटले असून त्याचा तब्बल ३२ मीटर लांबीचा भाग पाईपमध्येच अडकला आहे.