कोकणात अतिवृष्टीची शक्यता, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’
कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे ऑनलाईन ‘गुरुप्राप्ती शिबिर’ चैतन्यमय वातावरणात पार पडले !
भारताच्या विभाजनाची दुःखद आठवण करून देणारे जिन्ना हाऊस स्वातंत्र्यानंतर ओस पडून आहे. स्वातंत्र्यापूर्वी मोहम्मद अली जिन्ना यांनी १० वर्षे तेथेच राहून भारताचे ३ तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचा कट रचला होता.
गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री केल्याप्रकरणी २६ जून ते ९ जुलै या कालावधीत राज्यात १४ गुन्हे नोंदवण्यात आले असून या प्रकरणी ११ जणांना अटक झाली आहे.
आपल्याला मनोरंजन विश्व हे सक्षम मूल्ये आणि विवेक यांच्या आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेशबंदी असतांना राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकमधील आनंदवली येथील नवश्या गणपति मंदिराच्या गाभार्यात जाऊन आरती केली.
विक्रमगड, जव्हार, वाडा आणि पालघर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने विक्रमगडनजीकच्या हातणे येथे रिवेरा कोविड केंद्र चालू केले आहे. रुग्णालयाकडून सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत.
केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे. यानंतर दक्षिण मुंबईतून रमजान शेख याला ५० ग्रॅम हॅशिशसह क्रॉफर्ड मार्केट येथून अटक करण्यात आली.
तुफान’सारखे चित्रपट बनवणे हे ‘लव्ह जिहाद’च्या कारवाया करणार्यांचे षड्यंत्रच आहे ! यातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हिंदुविरोधी साखळी कशी कार्यरत आहे, हे लक्षात येते ! अशा चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा !
अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक केली आहे. १९ जुलैच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.