मुंबई – कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेवरून रत्नागिरी आणि सातारा येथे ‘रेड अलर्ट’, तर रायगडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. सध्या वाशिष्टी नदीचे पाणी ओसरल्यामुळे कोकण रेल्वे चालू झाली आहे; मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट खचल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.
अतिवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे १ जून ते २३ जुलै या कालावधीत राज्यातील १२६ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. या कालावधीत राज्यातील ४५ नागरिक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.