Shakuntala Railways : रेल्वे रूळ बनवणार्या ब्रिटीश आस्थापनाला स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्षे द्यावे लागत होते लाखो रुपयांचे भाडे !
‘सेंट्रल प्रोव्हिजन रेल्वे कंपनी’ या खासगी ब्रिटीश आस्थापनाने महाराष्ट्रातील अमरावती ते मूर्तजापूर हे १९० कि.मी. रेल्वेरूळ वर्ष १९१६ मध्ये बांधले होते. इंग्रज भारतातून गेल्यावर, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावरही या आस्थापनाला अनेक दशके १ कोटी २० लाख रुपये भाडे म्हणून द्यावे लागत होते.