मुंबई – प्रेयसीला घरी सोडण्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी सोहेल खान या युवकाला नागपाडा येथील त्याच्या घरातून अटक केले आहे. पीडित युवतीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल खान याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.
सोहेल खान याचा त्याच्या प्रेयसीसमवेत विवाह ठरला होता. त्यांच्या विवाहाला घरच्यांची मान्यता होती. महाविद्यालयात शिकणार्या प्रेयसीला महाविद्यालयात भेटून सोहेल खान याने ‘तिला घरी सोडतो’, असे सांगितले; मात्र त्यानंतर तिला भायखळा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.