अटल सेतूमुळे खाडीतील ६० टक्के मासे न्यून झाल्याने मासेमारांना हानीभरपाई द्यावी ! – मरी आई मच्छिमार सहकारी संस्था

  • ‘मरी आई मच्छिमार सहकारी संस्थे’ची याचिकेद्वारे मागणी

  • २८ ऑगस्ट या दिवशी सुनावणी

अटल सेतू

मुंबई – अटल सेतूमुळे खाडीतील ६० टक्के मासे न्यून झाले आहेत. याचा मासेमारीवर मोठा परिणाम होत असून आमच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे येथील मासेमारांना हानीभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ‘मरी आई मच्छिमार सहकारी संस्थे’ने केली आहे. संस्थेने याविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर २८ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे.

अटल सेतूमुळे वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, दिवा आणि बेलापूर येथील कोळीवाड्यातील मासेमारांचे उत्पन्न घटले आहे.