शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडी !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांमध्ये १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

वाझे यांची पोलीस कोठडी न्यायालयाने नाकारली !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळल्याप्रकरणी, तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

(म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी दादोजी कोंडदेव आणि रामदासस्वामी यांचा कुठलाही संबंध नाही !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस

केवळ ब्राह्मण आहेत; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्र्य होय…

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलावी ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

कोरोनाची तिसरी लाट पसरू नये, यासाठी विरोधी पक्षाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी केले आहे.

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू होणार; मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे म्हणाले, ‘‘ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नाहीत, तेथे शाळा चालू होऊ शकतात का ? याची चाचपणी चालू आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येत असलेला नवा उपक्रम

मुंबईच्या सुरक्षेसाठी वातावरणीय पालट कृती आराखडा सिद्ध !

उपाययोजना न काढल्यास पुढील १० वर्षांत मुंबई रहाण्यासाठी अयोग्य ठरण्याची भीती !

‘पब्जी’साठी १६ वर्षीय मुलाकडून आईच्या अधिकोषाच्या खात्यातून १० लाख रुपये खर्च !

पालकांनो, आपली मुले भ्रमणभाषवर नेमके काय पहातात, याकडे वेळीच लक्ष द्या आणि त्यांना ‘पब्जी’सारख्या खेळांच्या व्यसनांपासून दूर ठेवा !

वातावरणातील पालटामुळे वर्ष २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली जाईल ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

वातावरणातील पालट, चक्रीवादळ आणि अवेळी पडणारा पाऊस लक्षात घेतला, तर वर्ष २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली असेल. त्यात मुंबई महापालिकेच्या ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या ४ प्रभागांचा समावेश आहे,