मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपव्यवहारामुळे सखोल चौकशी करणार !

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँकेच्या) व्यवहारात गेल्या पाच वर्षांत अनियमितता झाल्याने या अधिकोषाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे या अधिकोषाचे अध्यक्ष आहेत…

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याच्या धर्तीवर कायदा सिद्ध करा ! – सौ. चित्रा वाघ, भाजप

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी कायदा) धर्तीवर कायदा सिद्ध करा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी केली.

महिलेकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होऊ नये, अशी कठोर शिक्षा आरोपींना व्हायला हवी ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, भाजप

आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे. महिला अत्याचारातील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढायला हवे. ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास आरोपीला देहदंडाची शिक्षा करावी’, अशी मागणी आम्ही लावून धरली; पण आजचे चित्र विदारक आहे..

इतर मागासवर्गीय समाजाविषयीची सखोल माहिती महाराष्ट्र शासनाला देण्यास केंद्रशासनाचा नकार !

इतर मागासवर्गीय समाजाची मते मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील त्यांचे आरक्षण पुन्हा प्राप्त करणे राज्यशासनासाठी महत्त्वाचे ठरणार होते; मात्र या सर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसाठी अडचण निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार – देवेंद्र फडणवीस

मुंबईत काही प्रभागांची तोडफोड करून त्यांना पाहिजे तसा प्रभाग सिद्ध करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून चालू आहे. निवडणूक आयोगाला याची माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने कृती केली नाही, तर न्यायालयात जाऊ.

इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी !

राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली असली, तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी समाप्त झाला आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय आरक्षणानुसार नव्याने अर्ज भरण्यात येणार का ?

वायू प्रदूषणाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली नवीन गुणवत्ता पातळी !

१००-१५० वर्षांपूर्वी जगात प्रदूषण नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती; मात्र विज्ञानामुळे आज पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीव नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी कधी मान्य करणार ?

२१ बँकांमधील कोट्यवधी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळणार !

विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परमबीर सिंह यांच्या विरोधातील चौकशीला गृहविभागाची अनुमती !

अवैध कृत्य आणि भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचे प्रकरण

कोल्हापूर दौर्‍यात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  २४ घंट्यांत क्षमा मागावी ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍यावरून मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत राजकीय नाट्य घडले होते.