सुकाणू समितीचे सदस्य प्रा. नितीन बानगुडे पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली गड आणि किल्ले यांच्या दुरवस्थेची माहिती !
गड आणि किल्ले यांची दुरवस्था लवकर दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी !
गड आणि किल्ले यांची दुरवस्था लवकर दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी !
कोरोनाच्या कालावधीत गरीब आणि निराधार नागरिकांपैकी कुणी उपाशी राहू नये, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी विनामूल्य देण्याचे घोषित केले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन याची समयमर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती
हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे बरे होईपर्यंत त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी वाझे यांनी विशेष न्यायालयाकडे केली आहे. याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विरोध दर्शवला असून २७ सप्टेंबर या दिवशी न्यायालयाकडे त्यांनी वरील भूमिका मांडली आहे.
भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
अनिल परब म्हणाले, ‘‘अंमलबजावणी संचालनालयाकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. मी कुणाला व्यक्तीगत उत्तरे देण्यास बांधील नाही.’’
पूर्वी हाताने कपडे धुतले जात असत. त्यात काळानुरूप पालट होत गेला आणि आता कपडे धुण्याची यंत्रे आली आहेत. त्यामुळे कपडे धुणे आता अधिक सोयीस्कर झाले आहे; परंतु नियमित कपडे धुतल्याने मग ते हाताने असोत की, धुलाईयंत्राने (‘वॉशिंग मशीन’ने), त्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचे रसायनतज्ञांनी म्हटले आहे.
वर्ष २०२०-२१ मध्ये २१७ घोटाळे ! देशभरात १ सहस्र ५३४ नागरी सहकारी बँका आहेत. त्यांपैकी एक तृतीयांश बँका महाराष्ट्रामध्ये आहेत.
महाराष्ट्रातील आरोग्य भरतीच्या प्रक्रियेत कोणताही चुकीचा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. ही परीक्षा पारदर्शक होईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
राज्यातील आरोग्य विभागातील ६ सहस्र १९२ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ८ लाख ६६ सहस्र ६६० उमेदवारांनी अर्ज भरले होते; मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा रहित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
सध्या ४० कृषी पर्यटन केंद्रांना संमती देण्यात आली असून ती पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्या माध्यमातून कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.