सौदी अरेबियातील धार्मिक स्थळाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी भारतातील मुसलमान आंदोलन करतात, याउलट भारतात हिंदूंच्या अनेक देवस्थानांचे सरकारीकरण झाले असतांना हिंदू निद्रिस्त असतात ? – संपादक
मुंबई – महंमद पैगंबर यांचे अंतिम विश्रामस्थळ समजल्या जाणार्या मदिना येथील अल् मुनव्वीर येथे चित्रपटगृहे आणि मनोरंजन केंद्र निर्माण करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. इस्लामसाठी पवित्र असलेल्या या शहरात अशा प्रकारे मनोरंजन केंद्रे उभारण्याच्या तेथील शासनाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई येथील मीनारा मशिदीच्या बाहेर २३ सप्टेंबर या दिवशी रझा अकादमी या भारतीय सुन्नी मुसलमान संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात सौदी अरेबियाच्या शासनाचा निषेध करण्यात आला.
सौदी अरेबियाच्या या निर्णयाविषयी मुसलमानांकडून फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक माध्यमांवर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विविध मुसलमान संघटनांच्या वतीनेही सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. (असा प्रकार हिंदूंच्या धार्मिक क्षेत्राच्या संदर्भात झाला असता आणि हिंदूंनी निषेध केला असता, तर पुरो(अधो)गाम्यांनी त्यांना ‘धर्मांध’ अन् ‘प्रतिगामी’ ठरवले असते. पुरो(अधो)गाम्यांच्या टीकेचे लक्ष्य केवळ हिंदू असतात, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक)