‘अँटिलिया’ प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिली ! – सायबर तज्ञाचा आरोप

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेपुढे आले पाहिजे ! सातत्याने होणारे लाचखोरीचे आरोप हे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद !

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेचे प्रभारी पदाचे दायित्व सोपवले !

उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.

हिंदु समाजाला हिणवणार्‍यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र ‘लूकआऊट’ नोटीस

पुन्हा नोटीस काढूनही उपस्थित न राहिल्यामुळे आयोगाने परमबीर सिंह यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करावेत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही धोक्याची चेतावणी आहे. हे सर्वांनी गांभीर्याने घेतले नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.

बंदीवानांमध्ये राष्ट्रभक्ती वृद्धींगत व्हावी, यासाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घेतली राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धा !

रामचंद्र प्रतिष्ठानद्वारे मागील ३ वर्षांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारे विविध राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत असून त्याला बंदीवानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करणे, हा सुनियोजित षड्यंत्राचा भाग वाटतो !

आजवर मोगल-अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि धर्मस्थळे यांवर वारंवार आक्रमणे करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तरीही विशाल हृदय दाखवत आक्रमणकर्त्यांनाही भारतभूमीने सामावून घेतले.

गुन्ह्यात समावेश नसल्यामुळे रश्मी शुक्ला यांना गुन्हा रहित करण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही !

राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती;

मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषिक १५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला उपक्रमाचा लाभ !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घेण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे तालिबानी प्रवृत्तीचे !’

तालिबान्यांच्या आतंकवादी कारवायांची तुलना हिंदुत्वाशी करून हिंदूंना आतंकवादी ठरवणारे जावेद अख्तर यांचे फुत्कार !