परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र ‘लूकआऊट’ नोटीस

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात चांदिवाल आयोगाने जामीनपात्र ‘लूकआऊट’ नोटीस काढली आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्हा आणि वसुली यांच्या प्रकरणी चौकशीला उपस्थित रहावे, यासाठी आयोगाने परमबीर सिंह यांना ३ वेळा नोटीस पाठवली आहे; मात्र उपस्थित न राहिल्यामुळे आयोगाने त्यांना दंड आकारला होता. पुन्हा नोटीस काढूनही उपस्थित न राहिल्यामुळे आयोगाने परमबीर सिंह यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.