- या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेपुढे आले पाहिजे ! – संपादक
- सातत्याने होणारे लाचखोरीचे आरोप हे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद ! – संपादक
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी मला ५ लाख रुपयांची लाच दिली असल्याचा दावा एका सायबर तज्ञाने केला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रविष्ट केलेल्या एका आरोपपत्रात या सायबर तज्ञाने ही धक्कादायक माहिती दिली आहे.
या तज्ञाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अँटिलिया घटनेनंतर ‘जैश-उल्-हिंद’ या आतंकवादी संघटनेने या घटनेचे दायित्व स्वीकारले, असे मला अहवालात लिहिण्यास सांगितले होते. यासाठी सिंह यांनी मला ५ लाख रुपये दिले होते.